मागील वर्षी तब्बल 4405 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण

नवी दिल्ली : रेल्वेने मागील वर्षी सर्वाधिक 4405 किलोमीटरचा रेल्वेमार्ग बदलला आहे. या आधुनिकीकरणाचा थेट प्रभाव रेल्वे दुर्घटनांच्या प्रमाणावर दिसून आला. रेल्वेनुसार 2017-18 आर्थिक वर्षात 73 दुर्घटना झाल्या, हे प्रमाण 57 वर्षांच्या कालावधीतील सर्वात कमी ठरले आहे.

2016-17 मध्ये दुर्घटनांची संख्या 104 इतकी होती. 2016-17 च्या तुलनेत 2017-18 मध्ये बळींचा आकडा देखील 42 टक्क्यांनी कमी झाला आहे. रेल्वेने सुरक्षेत वृद्धीचे शेय रेल्वेमार्ग नूतनीकरण प्रक्रियेला दिले आहे. 2017-18 मध्ये 4405 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बदलण्यात आला आहे. कोणत्याही आर्थिक वर्षात हे सर्वाधिक प्रमाण ठरले आहे. याच्या अगोदर 2004-05 मध्ये 4175 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे नूतनीकरण करण्यात आले होते आणि याकरता 17 हजार कोटींचा खर्च झाला होता.

रेल्वेनुसार 2017-18 मध्ये रेल्वेगाडय़ांनी सर्वाधिक 170 कोटी किलोमीटर अंतर कापले आहे. 1960-61 मध्ये हे प्रमाण 38 कोटी किलोमीटर इतके होते. मागील काही वर्षांमध्ये रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. रेल्वेनुसार यंदा रेल्वेशी संबंधित दुर्घटनांमध्ये एकूण 254 जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या 607 च्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 42 टक्क्यांनी कमी राहिले आहे. रेल्वेचे डबे घसरण्याच्या घटनांमध्ये देखील यंदा घट नोंदली गेली आहे. यंदा 54 वेळा रेल्वे रूळावरून घसरली आहे. मागील वर्षी हे प्रमाण 78 इतके होते. रेल्वे क्रॉसिंगवर मागील वर्षाच्या 30 दुर्घटनांच्या तुलनेत यंदा 17 घटनांची नोंद झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)