मागील पिढ्यांमुळे आम्ही सुखात- प्रा. पठारे

सणसवाडी- स्वातंत्र्यासाठी अनेकजणांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले होते. मागील पिढयांनी हालअपेष्टा सोसल्या आहेत. म्हणून आम्ही आज सुखात जगतो आहे, असे प्रतिपादन प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथे सावता महाराज मंगल कार्यालयात आखिल भारतीय महात्मा समता परिषदेतर्फे आयोजित सोनाई व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, माजी आमदार काकासाहेब पलांडे, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. हरि नरके, माजी सभापती आरती भुजबळ, समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळ, विद्या बॅंकेचे संचालक महेश ढमढेरे, सुरेश थोरात, अनिल भुजबळ, संगीता नरके, आबासाहेब मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फुले- शाहू- आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. हरि नरके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा पुस्तके देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुपंत नरके यांनी केले. सोमनाथ भुजबळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)