मागासवर्ग आयोगाचे काम प्रगती पथावर

संग्रहित छायाचित्र

मराठा आरक्षण : राज्य सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

– 45 हजार कुटुबांच्या माहितीवर अहवाल तयार
– निवेदनांची छाननी पूर्ण
– 15 नोव्हेंबरला आयोगाचा अहवाल सादर होणार

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचे काम प्रगतीपथावर आहे. आयोगासमोर मोठ्या प्रमाणात आलेल्या निवेदनांची तज्ज्ञांमार्फत छाननी पूर्ण करून अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच 45 हजार कुटुबांचा सर्व्हे करून त्याचाही अहवाल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली.

विशेष सरकारी वकील ऍड. रवी कदम यांनी न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर दोन पानी प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली.

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण. तसचे मराठा समाजातील तरूणांच्या आत्महत्या या पार्श्‍वभूमीवर मराठा आरक्षणाचा आयोगाकडे प्रलंबित असलेला मुद्दा निश्‍चित कालमर्यादा ठरवून निकाली काढावा, यासाठी विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती आर.एम. सावंत यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने आयोगाच्या कामाचा प्रगत अहवाल न्यायालयात सादर केला. याची दखल न्यायालयाने घेऊन चार आठवड्यांनी कामकाजाचा प्रगत अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

मोठ्या प्रमाणात निवेदने
मराठा आरक्षणासंदर्भात आयोगाकडे मोठ्या प्रमाणात निवेदने आली आहेत. या निवेदनांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्र शिक्षण सांख्यकी अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने या निवेदनांची छाननी करून अहवाल तयार केला आहे.

45 हजार कुटूंबाचा सर्व्हे
छत्रपती शिवाजी प्रबोधिनी संस्था (औरंगाबाद), रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (मुंबई), शारदा कन्सल्टन्सी सर्विसेस (नागपूर), गुरुकृपा विकास संस्था (कल्याण) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिक्‍स अँड इकॉनॉमिक्‍स (पुणे) या पाच संस्थांनी सुमारे 45 हजार कुटंबांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थीक दर्जा संदर्भात सर्व्हे करून अहवाल तयार केला आहे. हे दोन्ही अहवाल आयोगाकडे आज सोपविले जाणार आहे, अशी माहिती ऍड. रवी कदम यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)