मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेना

पिंपरी – महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींस शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमा राज्यभरातील अनेक शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये संस्था चालकांकडून वेळेवर मिळत नसल्याची तक्रार जनसुराज्यशक्ती पक्षाचे अनुसुचित जाती-जमाती सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी केली आहे.

यासंदर्भात शंकरराव कांबळे यांनी समाज कल्याण आयुक्त (पुणे) मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना फी भरण्याचा तगादा लावून वेठीस धरणे, परिक्षांना बसु न देणे यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही बाब गंभीर असून शासनाने असे प्रकार तातडीने थांबवून विद्यार्थ्यांना न्याय देणे गरजेचे आहे.

मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शैक्षणिक संस्था, संस्था चालक यांच्यावर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, प्रसंगी संस्थांच्या मान्यता रद्द कराव्यात, अशी मागणी शंकरराव कांबळे यांनी करत याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)