मागासवर्गीय कुटुंबाना मिळणार मोफत गॅस जोडणी

नवी दिल्ली : दलित आणि मागासवर्गीय कुटुंबाना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तशी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी घरांना याचा फायदा मिळणार आहे. मोदी सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

देशातील पाच कोटी मागासवर्गीय घरांमध्ये मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्यात आली होती. मात्र, आता याची व्याप्ती वाढवण्यात आली असून हा आकडा आठ कोटींवर नेण्यात आला आहे. २० एप्रिल हा ‘उज्ज्वला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचंच औचित्य साधत या योजनेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)