मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घ्या

एम्प्लॉईज फेडरेशनची ना. आठवले यांच्याकडे मागणी

सातारा – घटनात्मक तरतूद असलेल्या अनुसूचित जाती व जमातीमधील शासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती द्या तसेच भटके जाती, विमुक्त जमाती आणि उर्वरित ओबीसी यांच्या पदोन्नतीबाबत घटनात्मक तरतूद करा, अशी मागणी रिब्लिकन एम्पलॉईज फेडरेशनच्यावतीने ना. रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली.

सातारा दौऱ्यावर आलेले रामदास आठवले यांना फेडरेशनच्यावतीने गणेश दुबळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी प्रामुख्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा अध्यादेश तात्काळ काढण्याची मागणी दुबळे यांनी केली. त्याचबरोबर सातारा नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांना मोफत घरकुले देण्यात यावीत, नगरपरिषदेचे बिंदुनामावली तथा रोष्टर पुर्ण करून पदोन्नतीचा निर्णय घेण्यात यावा, लाड व पागे समितीच्या शिफारशींवरील अंमलबजावणी करून वारसा व अनुकंपाच्या जागा भरण्यात याव्यात, नगरपालिका कर्मचाऱ्यांचा 20 लाख रूपये पर्यंचा विमा काढण्यात यावा यासह कर्मचाऱ्यांचा मेडिक्‍लेम 5 लाख रूपयांपर्यत करण्याची मागणी दुबळे यांनी केली.

त्याचप्रमाणे आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल आता आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून घोषित करण्यात यावी, तेथील मुख्याध्यापक पद कायमस्वरूपी भरण्यात यावे, शाळेचा पट वाढविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, शाळेच्या परिसरात उच्च दर्जाचे ग्रंथालय सुरू करण्यात यावे, प्रतापसिंह शेती फार्ममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र सुरू करावे, अशी मागणी ना. आठवले यांच्याकडे करण्यात
आली.

 

शालेय पोषण आहाराच्या मांडल्या मागण्या
दरम्यान, यावेळी शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस कर्मचारी फेडरेशनच्यावतीने ना. आठवले यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार 18 हजार रूपये वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांना चपरासी कम कुक या पदावर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, स्वयंपाकी मानधन, इंधन, भाजीपाला व पुरक आहाराचे बिल दर महिन्याच्या 5 तारखेला खात्यावर जमा करण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्‍शन व गणवेश देण्यात यावा आणि कर्मचाऱ्यांचा शासनाच्यावतीने मोफत विमा उतरविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)