मागासवर्गीयांच्या रक्षणाची तरतूद राज्यघटनेतच

पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्मान भारत योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन 

जनगाला (बिजापूर) – समाजातील मागासवर्गीयांच्या हक्कांच्या रक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतच तरतूद केली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविषयक कार्यक्रम आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्‌घाटन करून शुभारंभ केला. छत्तीसगडमधल्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी बिजापूर जिल्ह्यात “जांगला विकास हब’मध्ये या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आदिवासी जमातींच्या सबलीकरणासाठी जन धन योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी केला. या योजनेअंतर्गत किरकोळ वन उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत आणि मूल्य साखळी विकासाद्वारे विपणन यंत्रणा अंतर्भूत आहे. भानूप्रतापपूर-गुड्‌म रेल्वे मार्गाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यांनी लोकार्पण केले. दाल्लीराजहारा आणि भानूप्रतापपूर दरम्यानच्या रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. बिजापूर रुग्णालयात त्यांनी डायलिसीस केंद्राचे उद्‌घाटन केले. तसेच या प्रसंगी आदर्श आंगणवाडी केंद्राला भेट देऊन त्यांनी आंगणवाडी कार्यकर्ते आणि पोषण अभियानाच्या लाभार्थी बालकांशीही संवाद साधला.

“हाट आरोग्य किओस्कर’ला भेट देऊन आरोग्य कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी बातचीत केली. मुद्रा योजनेअंतर्गत निवडक लाभार्थींना त्यांनी कर्जमंजुरी पत्रांचं वाटप केले आणि जांगला येथे बॅंक शाखेचे उद्‌घाटनही केले. ग्रामीण बीपीओ कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

नक्षल प्रभावित भागात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 1988 किलोमीटरच्या रस्ते बांधकामाचे नक्षल प्रभावित भागांना जोडणाऱ्या इतर रस्ते प्रकल्प, बिजापूर येथे पाणीपुरवठा योजना आणि दोन पुलांचे त्यांनी भूमीपूजन केले. ब्रिटीश साम्राज्य वादाविरोधात लढा देताना या भागात हौतात्म्य पत्करलेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्‌यात प्राण गमावलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

छत्तीसगडमधून केंद्र सरकारने याआधी शामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आणि प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या दोन महत्त्वाकांक्षी विकास योजनांचा शुभारंभ केला. करोडो लोकांच्या मनात आकांक्षा फुलवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

विकासाच्या प्रवासात मागे राहिलेल्या आणि आता हा अनुशेष भरून काढण्यासाठी निवडलेल्या देशातल्या 100 विकासाकांक्षी जिल्ह्यापैकी, बिजापूर हा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यांची मागास ही ओळख पुसून त्यांचे महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात रुपांतर करण्याची आपली आकांक्षा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता या सर्वांनी या सामूहिक चळवळीत आपले योगदान दिले तर अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या 115 जिल्ह्यांप्रती सरकारने आगळा दृष्टीकोन अंगीकारला असल्याने या प्रत्येक जिल्ह्यांप्रती वेगवेगळ्या धोरणाची आवश्‍यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)