मागविला कॅमेरा, आल्या साबणाच्या वड्या

मंचर- मंचर येथील ग्राहक अशा धनंजय थोरात यांची ऑनलाईनद्वारे आलेल्या वस्तुमुळे फसवणूक झाली आहे. 25 हजार रूपयांच्या कॅमेराऐवजी तीन साबणांच्या वड्या पाहून ग्राहकाने डोक्‍याला हात लावला. संबंधित कंपनीच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तसेच ग्राहक न्यायालयात संबंधित मालकाने फसवणुकीची तक्रार दिली आहे.
मंचर येथील आशा धनंजय थोरात यांनी ऑनलाईनद्वारे कॅनॉन कंपनीचा कॅमेरा मॉडेल नंबर डी.एस.एल.आर नंबर 1300 डी हा कॅमेरा ऑनलाईनद्वारे एका कंपनीकडे बुधवारी दि. 4 एप्रिल रोजी बुक केला. शनिवारी (दि. 7) कॅमेरा मंचर येथील केंद्रावर आल्याचा मॅसेज आशा थोरात यांना आला.त्यानुसार कॅमेऱ्याचे पार्सल आणण्यासाठी ग्राहक आशा यांचा मुलगा अनंत थोरात हा 24 हजार 990 रूपये घेढन संबंधित कार्यालयात गेला. पैसे देऊन पार्सल ताब्यात घेतले. घरी आणल्यानंतर पार्सलद्वारे आलेले बॉक्‍स फोडल्यानंतर त्यामध्ये कॅमेराऐवजी साबणाच्या तीन वड्या निघाल्या. यामुळे संबंधित ग्राहकांला मनस्ताप होऊन आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. त्याने संबंधित कंपनीच्या हेल्पलाईनला फोन करून फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर चार दिवसांनी संबंधित कंपनीने आम्ही केलेल्या चौकशीत आमचा कोणताही दोष नसून रिफंड अथवा कॅमेरा देऊ शकत नसल्याचे सांगून जबाबदारी ढकलली. यामुळे संबंधित ग्राहकाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली आहे. या संदर्भात संबंधित कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे ग्राहक आशा धनंजय थोरात यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)