मागणी नसल्याने मासळीचे भाव उतरले

अंडीही स्वस्त : मटण, चिकनचे भाव मात्र स्थिर

पुणे, दि. 27 – गणेशोत्सवामुळे मासेमारी घटली आहे. त्यातच मासळीला मागणी नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात अल्पशी घट झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकुर परदेशी यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात वाढलेल्या अंड्याच्या भावात घसरण झाली आहे. गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे 30 रुपयांनी, तर इंग्लिश अंड्याच्या भावात 20 रुपयांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण आणि चिकनचे भाव मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
सध्या गणेश पेठ येथील मासळी बाजारात पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक होत आहे. रविवारी येथील बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 10 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 300 ते 500 किलो आणि नदीतील मासळीची सुमारे 200 ते 300 किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहु, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 5 ते 6 टन आवक झाली असल्याचे ठाकुर यांनी सांगितले आहे. सध्या मासळीला मागणी नाही. मात्र, गणेश विसर्जनानंतर पुन्हा मासळीची मागणी वाढेल, असा अंदाजही ठाकुर यांनी वर्तविला आहे.

मासळीचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) ः पापलेट ः कापरी ः 1300-1400, मोठे ः 1200, मध्यम ः 750, लहान ः 550, भिला ः 400, हलवा ः 320-400, सुरमई ः 440, रावस लहान ः 440, मोठा ः 500, घोळ ः 400, करली ः 200-280, करंदी ( सोललेली ) ः 240, भिंग ः 240, पाला : 800-1200, वाम ः 200-360, ओले बोंबील ः 60-100.

कोळंबी ः लहान : 200, मोठी : 400, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स ः 750, लॉबस्टर ः 1400, मोरी : 200-280, मांदेली : 80, राणीमासा : 160, खेकडे : 160-200, चिंबोऱ्या : 360-400.
खाडीची मासळी ः सौंदाळे ः 180-200, खापी ः 160-200, नगली ः 200-400, तांबोशी ः 400, पालू ः 200, लेपा ः 100, शेवटे : 200, बांगडा :160, पेडवी ः 60, बेळुंजी ः 100, तिसऱ्या : 160, खुबे : 120, तारली : 100.

नदीची मासळी ः रहू ः 140, कतला ः 140, मरळ ः 320, शिवडा : 160, चिलापी : 80, मांगूर : 120, खवली : 60, आम्ळी ः 60, खेकडे ः 160, वाम ः 400.

मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे ः 440, खिमा ः 440, कलेजी : 480.

चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 230.

अंडी : गावरान : शेकडा : 620, डझन : 84 प्रति नग : 7.00 इंग्लिश : शेकडा : 365 डझन : 48 प्रतिनग : 4.00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)