मागणी घटूनही फुलांचे भाव स्थिर

पिंपरी – फुलांना मागणी घटली, तरीदेखील फुलांचे भाव स्थिर आहेत. परिणामी फुलबाजारात मंदीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भावात किंचित घसरण झाली आहे. लग्नसराई सुरू होईपर्यंत फुल बाजारातील मंदी राहण्याची शक्‍यता फुलविक्रेत्यांनी वर्तविली आहे.
फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे-झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)-30 ते 40 रुपये किलो, गुलछडी-60 ते 80 रुपये, लिली बंडल-6 ते 8 रुपये, जरबेरा बंडल- 40 ते 50 रुपये, तुकडा गुलाब (डच ) 100 ते 120 रुपये, गुलाब गड्डी (साधा)- 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 50 ते 60 रुपये, अष्टर चार गड्डी- 8 ते 10 रुपये, कागडा बंडल- 200 ते 250 रुपये, बिजली- 20 ते 30 रुपये. किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा प्रति नगाचा भाव 10 रुपये आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)