पिंपरी– गणपती प्रतिष्ठापना आणि गौरीच्या आगमनामुळे फुलांची आवक वाढूनही भाव चढेच राहिले होते. मात्र, गौरी पूजनाचा कार्यक्रम दोनच दिवसाचा असल्याने नागरिकांकडून होणारी फूलांची मागणी घटली आहे. तसेच, आवकही वाढली असल्याने फुलांचे भाव घसरले असल्याची, माहिती फुल विक्रेता सोमनाथ शिंदे यांनी दिली.

बाजारात तीन दिवस फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. तरी सुद्धा फुलांचे भाव कमालीचे वधारले होते. रविवारी कमी प्रमाणात फुलांना मागणी असल्याचे दिसले. परंतु, फुलांची आवक जास्त झाली व मागणी घटल्याने त्यांचे भाव घसरले होते. गणपती प्रतिष्ठापनेपासून शेवंती फुलाचे भाव 200 रूपये किलो होती. सध्या त्या फुलाचा दर 150 रूपये किलो आहे. तसेच, गुलछडी फुलाची आवक घटली असून त्याचे भाव 350 ते 400 रूपयापर्यंत घसरले आहेत. झेंडूचे भाव घसरून 16 ते 20 रूपये किलो झाले आहे. गणपती विसर्जनापर्यंत फुलांचे भाव सध्या आहेत तेवढेच राहण्याची शक्‍यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

पावसामुळे विक्रेत्यांची धांदल उडाली
पाच वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने बाजारातील विक्रेत्यांची एकच धांदल उडाली होती. यामुळे, पावसाने ग्राहकांना देखील सळो की पळो करून सोडले होते. मात्र, बाहेरगावावरून फुले, दुर्वा, कमळ विक्रीसाठी आणलेल्या विक्रेत्यांना निवाराच नसल्याने भिजतच साहित्याजवळ उभे राहिल्याचे दृश्‍य पहावयास मिळाले. तसेच, काहींनी आजूबाजूच्या दुकानांजवळ आसरा शोधला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)