मागणीअभावी फुलांचे भाव वीस टक्‍क्‍यांनी घटले

पिंपरी- दिवाळीनिमित्त सुरू झालेली फुलांची आवक अद्यापही तेजीत आहे. मात्र ग्राहकांकडून मागणी नसल्याने फुलांच्या भावात वीस टक्के घट झाली आहे. लग्नसराई सुरू होईपर्यंत फुल बाजारातील आवक कायम राहण्याची शक्‍यता फुल विक्रेत्यांनी वर्तविली आहे. लग्नसराईत फुलांना चांगली मागणी वाढू शकते.
फुलांचे दर प्रति किलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे-झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)-40 ते 50 रुपये किलो, गुलछडी-80 ते 100 रुपये, लिली बंडल-6 ते 8 रुपये, जरबेरा बंडल- 40 ते 50 रुपये, तुकडा गुलाब (डच ) 80 ते 100 रुपये, गुलाब गड्डी (साधा)- 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 40 ते 50 रुपये, अष्टर चार गड्डी- 10 ते 12 रुपये, अष्टर 50 ते 60 रुपये प्रति किलो, कागडा बंडल- 300 ते 350 रुपये, अबोली बंडल- 80 ते 100 रुपये. किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा प्रति नगाचा भाव 10 रुपये आहे.
पिंपरी : फुलांची आवक वाढली असून, भावात किंचित घट झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)