माक्‍या शिरतोडेसह तिघांवर मोक्का कारवाई

सात पोलीस ठाण्यांमध्ये 16 गंभीर गुन्हे दाखल

सातारा,दि.5 प्रतिनिधी- फलटणच्या महेश उर्फ माक्‍या शिरतोडेसह तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिघांवर सातारा व पुणे जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपोच एकूण 16 गुन्हे दाखल असल्याने अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
28 जानेवारी 2018 रोजी खामगाव, ता.फलटणच्या हद्दीत असलेल्या नारळीबाग, पाच सर्कल येथून बहिण-भाऊ मोटरसायकलवरून भाचाला शोधण्यासाठी जात असताना माक्‍या शिरतोडेसह तिघांनी त्यांना अडवून 47 हजार रूपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. त्याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्हा संघटितपणे व आर्थिक फायद्यासाठी केला असल्याने त्यांच्याविरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये तथा मोक्कांतर्गत तपास करण्यासाठी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर व पुरावे गोळा करून तपास पुर्ण झाल्यानंतर मोक्कांतर्गत कारवाईचे दोषारोपपत्र अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच अति.पोलीस महासंचालकांनी महेश उर्फ माक्‍या दत्तात्रय शिरतोडे, रा.मोतीचौक फलटण, विशाल कुंडलिक जाधव, रा. सरडे ता.फलटण व सुग्रीव अंकुश भंडलकर रा.खांडज ता.बारामती यांच्याविरोधातील दोषारोपपत्र पाठविण्यास परवानगी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)