माकारोव्हा-व्हेस्निनला महिला दुहेरीचे विजेतेपद

पुरुष दुहेरीत कुबोट-मेलो विजयी

लंडन – महिला दुहेरीत द्वितीय मानांकीत आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या रशियाच्या एकेटेरिना माकारोव्हा आणि एलेना व्हेस्निन या जोडीने विजेतेपदाला गवसणी घातली. पोलंडच्या लुकास कुबोट आणि ब्राझिलच्या मार्सेलो मेलो यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.

शनिवारी रात्री उशीरा खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कुबोट आणि मेलो या चौथ्या मानांकित जोडीने 4 तास 39 मिनीटे रंगलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात ऑस्ट्रियाच्या ओलिवर मराच आणि क्रोएशियाच्या मेट पाव्हिच या सोळाव्या मानांकित जोडीचा 5-7, 7-5, 7-6, 3-6, 13-11 असा पराभव केला.

महिला दुहेरीत रशियाच्या जोडीने तैपईची हाव चिंग चॅन आणि रुमानियाची मोनिका निकोलस्क्‍यू यांचा सरळ सेटमध्ये 6-0, 6-0 असा पराभव करत सहज विजय मिळविला. विम्बल्डनच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा असा महिला दुहेरीचा अंतिम सामना झाला आहे, ज्यात “डबल बॅगल’मध्येच सामन्याचा निकाल लागला. दुसऱ्या मानांकित रशियाच्या जोडीने देशाला तिसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकून दिले आहे. यापूर्वी त्यांनी 2013मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये युएस ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते.

विजेतेपद जिंकल्यानंतर मेलो म्हणाला, या कोर्टवर खेळण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावले आहे. मी स्पर्धेचा संपूर्ण आनंद घेऊ इच्छितो, असे लुकासला सामन्यापूर्वी मी सांगितले होते. यापूर्वीही मी एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालो, मात्र विजय मिळविता आला नाही. आता मी विजेतेपद मिळविण्यास सज्ज आहे, असे त्याने सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)