माकपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सिताराम येचुरी यांची फेरनिवड

हैदराबाद : पक्षाचे ज्येष्ठ नेते सिताराम येचुरी यांची माकपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. येचुरी यांना दुसऱ्यांदा पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व देण्याचे बहुमताने मान्य करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्यानिमित्त हैदराबाद येथे गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या माकपच्या २२ व्या प्रतिनिधी मंडळाची बैठक सुरू आहे. त्यात येचुरी यांची निवड करण्यात आली. याच बरोबर पक्षाच्या विविध प्रमुख पदांसाठी एकूण ९५ पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे.

भाजपचा पराभव, हिंदुत्ववादी विचारांचे विघटन आणि देशाचा आर्थिक विकास हे तीन मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत. या तीन विषयांवर अनेक बाजूनी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे.  केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये घेतलेल्या विविध निर्णयांवर यावेळी टीका करण्यात आली. तसेच मोदी सरकार देशहितासाठी घातक असल्याची टीका यावेळी सर्व वरिष्ठ नेत्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)