माकपच्या महासचिवपदी सिताराम येचुरी यांची फेरनिवड

हैद्राबाद – मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) सीताराम येचुरी यांची महासचिवपदी पुन्हा फेरनिवड केली आहे. येचुरी यांच्या फेरनिवडीची घोषणा 22व्या पक्ष संमेलनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी करण्यात आली. 65 वर्षीय सीताराम येचुरी यांनी 2015मध्ये विशाखापट्टणम्‌ येथे संपन्न झालेल्या21व्या पक्ष संमेलनात प्रकाश करात यांना पराभूत करत महासचिवपटी विराजमान झाले होते.

या निवडीची घोषणा केंद्रीय समितीच्या 95 सदस्यांनी केली. दरम्यान, नवनिर्वाचित केंद्रीय समितीच्या पहिल्या बैठकीत सीताराम येचुरी, प्रकाश करात, बिमन बसु, वृंदा करात, माणिक सरकार यांच्यासह 17 जणांची महासचिव पदाच्या उमेदवारीसाठी निवड करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)