माकपचीही मोदी सरकारविरोधात अविश्‍वास ठरावासाठी नोटीस

नवी दिल्ली – मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्‍वास ठरावासाठीची नोटीस दिली. असे पाऊल उचलणारा माकप हा चौथा पक्ष ठरला आहे. याआधी आंध्रप्रदेशमधील सत्तारूढ तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर कॉंग्रेसने सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडले. त्यापाठोपाठ शुक्रवारी कॉंग्रेसनेही असेच पाऊल उचलले.

आता लोकसभेत सरकारवरील दबाव वाढवण्याच्या विरोधकांच्या रणनीतीचा भाग म्हणून नोटीस दिल्याचे माकपने नमूद केले आहे. लोकसभेत मोदी सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे विरोधकांच्या अविश्‍वास ठरावांचा कुठलाही परिणाम सरकारवर होणार नाही. मात्र, या ठरावांच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)