माकपचा कांगावा (पत्रसंवाद)

नुकताच कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांचा लेख वाचला. त्यात त्यांनी 43% मतांचे तुणतुणे वाजवले आहे. दिनांक 12/3/2018 च्या लालबावटा पक्षाच्या मुंबई मोर्चासमोर बोलताना येचुरी म्हणाले होते की, अच्छे दिन आलेच नाहीत तेव्हा आमचे पुराने दिन लौटा दो ! मग सांगा ना 20 वर्षात त्रिपुरात, 35 वर्षात बंगालमध्ये काय सोन्याचा धूर काढलात ते ! हा चमत्कार येथे आधीच का नाही केला? अभ्यंकर, कानगो यांनीही लेख, पुस्तक लिहावे की जे इतर राज्यांना मार्गदर्शक ठरेल ! काल परवा मुंबईत आलेल्या या लाल टोपीधारी वनवासी शेतकऱ्यांना (3 वर्षपूर्वीच्या ) गेल्या 15 वर्षात का बरे न्याय मिळवून दिला नाही ? तेव्हा सरकार तर तुमच्या दोस्त मंडळींचेच होते ना; अगदी केंद्रातसुद्धा!

का तुम्हीच याना विसरला होतात? तुमचे समविचारी पक्ष आता पंजाच्या आधारे राज्यसभेत जाऊन लाईफटाईम पेन्शनची तरतूद करण्याच्या विचारात दिसत आहेत. कशाला हवे पगार-पेन्शन? देऊन टाका सगळी रक्‍कम शेतकऱ्यांना! बघू काय काय होते ते! माकपा कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांवर केलेल्या भीषण हल्ल्यांविषयी आलेल्या बातम्यांवर सुद्धा त्यांना बोलता आले असते; पण काय बोलणार? मोदी सरकारविरुद्ध म्हणजे भाजपा विरुद्ध बोलताना विकासाचा फुगा फुटला असा शेरा मारण्यापूर्वी गरिबी हटाव घोषणेचा फज्जा उडाल्याचे या अभ्यासू माणसांना दिसले नाही का? आम्ही शेतमजुरांसाठी लढतो अशी आरोळी मारताना लाल बहाद्दुर शास्त्रींची जय जवान-जय किसान घोषणा 50 वर्षात का राबविली गेली नाही, असा प्रश्‍न यांना कधी पडला नाही का ?

 – प्रमोद बापट, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)