माओवाद्यांशी संबंध नसल्याचा गडलिंग यांचा न्यायालयात युक्‍तीवाद

पुणे  – पोलिसांना मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या घरातून केवळ संगणकामधून पत्रेच कशी मिळतात, माओवाद्यांशी संबंध असल्याचे पोलीस म्हणत असतील तर, त्यांना आमच्या घरातून बॉम्ब, लेखी पत्राच्या हार्डकॉपी का मिळणे अपेक्षीत आहे. आमच्या घरातून ते न मिळण्याचे एवढेच कारण आहे की, आमचा माओवाद्यांशी संबंध नाही, असा युक्‍तीवाद अॅड.गडलिंग यांनी न्यायालयात केला.

विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी झाली. माओवाद्यांशी सबंध असल्याचा पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही. भूमिगतपणे गुप्त कारवाया करत असल्याचे दाखविण्यासाठीही पोलिसांकडे कोणती कागदपत्रे उपलब्ध नाही. डोक्‍यातल्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी आमच्या घरावर छापा टाकतात. कायद्यातील नीड टू नो प्रिन्सिपल यामध्ये सापडलेले पत्र लागूच होत नाही, असेही अॅड. गडलिंग म्हणाले.

पत्रात 10 ते 12 मानवाधिकार कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला आहे. साईबाबाच्या खटल्यात प्रकाश हाच साईबाबा असल्याचे नमूद आहे. जर प्रकाश तुरुंगामध्ये असेल तर, या प्रकरणातील संशयित आरोपींना तो कसा पत्र व्यवहार करेल, असा प्रश्‍न उपस्थित केला. आम्हाला गुंतविण्यासाठी पोलीस दुसरा प्रकाश उभा करत असल्याचेही गडलींग यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने दोनदा परवानगी नाकारली असताना माझ्या घरी विना सर्च वॉरंट छापे टाकण्यात आले. आम्ही मानवाधिकार कार्यकर्ते सध्याच्या व्यवस्थेविरोधात बोलतो म्हणून आम्हाला गजाआड टाकले आहे. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे कबीर कला मंचाने कोणताही कार्यक्रम घेतला नव्हता. या घटनेला मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचे पोलिसांनी या अगोदरच सर्वोच्च न्यायालयात तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विधानसभेत सांगितले आहे. रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांचे नाव साईबाबा खटल्याच्या निकालात कोठेही उल्लेख नसताना त्या खटल्यात दोघांचा संबंध असल्याचे या प्रकरणात सांगितले जात आहे.

गडलिंग म्हणाले, साईबाबाच्या खटल्यातील तपास अधिकारी बावशे यांनी एक 164 खाली जबाब नोंदविला होता. त्या जबाबाचा उपयोग या खटल्यात होत आहे. माझ्या घरावर जेव्हा छापे टाकले गेले तेथेही बावशे हजर होते. या खटल्याशी काही संबंध नसताना बावशे या प्रकरणात कोर्टात वारंवार उपस्थित असतात. कारण त्यांना मला या प्रकरणात गोवायचे होते आणि त्यानी ते केले.

फॉरेन्सिक लॅबरोटरी (एफएसएल) आणि पोलीस गृहखात्यात अखत्यारीत येत असल्याने मिळालेल्या इलेक्‍ट्रॉनिक डेटामध्ये त्यांना पाहिजे तसे फेरबदल करता येतात. त्याच आधारे पोलिसांनी थंड डोक्‍याने ही बनावट पत्रे तयार केल्याचा आरोप अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी त्यांच्या जामीनावरील युक्‍तीवादा दरम्यान केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)