माओवाद्यांच्या विरोधात संघटीत कारवाई

एकट्या छत्तीसगड मध्ये वर्षभरात पाचशे समर्थकांना पकडले
नवी दिल्ली – सीआरपीएफच्या नक्षलविरोधी ऑपरेशन मध्ये माओवाद्यांच्या समर्थक आणि सहकाऱ्यांच्या विरोधात प्रथमच मोठ्या प्रमाणात संघटीत कारवाई हाती घेण्यात आली असून या मोहीमे अंतर्गत एकट्या छत्तीसगड राज्यात गेल्या वर्षभरात पाचशेहून अधिक माओवादी समर्थकांची धरपकड करण्यात आल्याची माहिती सीआरपीएफचे महासंचालक आर.आर. भटनागर यांनी दिली.

पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की विविध राज्यांतील पोलिसांच्या मदतीने व्यापक स्तरावर ही कारवाई करण्यात येत आहे. प्रत्यक्ष अंडरग्राऊंड राहुन कारवाया करणाऱ्यांना समाजात वावरणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सहाय्य केले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर माओवाद्यांच्या या छुप्या समर्थकांच्या विरोधात आम्ही ही मोहीम सुरू केली. या मोहीमेत आम्ही आमचे तब्बल एक लाख जवान कार्यरत केले. माओवाद्यांना पुरवण्यात येणारी शस्त्र आणि पैशाचा शोध घेऊन आम्ही त्यांच्या विरोधात ही मोहीम राबवली असे ते म्हणाले.

माओवाद्यांना शहरी भागातून मिळणारा मदत पुरवठा तोडण्याचा आमचा प्रमुख हेतू आहे. त्याच बरोबर जेथे माओवाद्यांचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे त्या भागातही आम्ही आमचे नेटवर्क मजबूत करीत आहोत त्यासाठी अत्यंत संवेदनशील भागात 15 नवीन ठाणी उभारली आहेत. आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, आणि महाराष्ट्रातील जंगल भागात ही ठाणी सुरू करण्यात आली आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

धोरणात्मक बळ देऊन आम्ही ही मोहीम यशस्वी करत आणली आहे असे ते म्हणाले. हे करत असताना आमच्या दलाचे कमीतकमी नुकसान व्हावे असेही उद्दीष्ट आम्ही ठेवले होते. त्यातही आम्हाला यश आले असून आमची जीवित हानी अत्यंत मर्यादित स्वरूपात झाल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)