माओवादी संबंध प्रकरण : वरवरा राव भूमिगत माओवाद्यांशी संपर्कात

दोषारोपपत्र दाखल 90 दिवसांची मुदतवाढ 

पुणे – एल्गार परिषदेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात अटक झालेले कवी वरवरा राव हे भूमिगत माओवाद्यांशी संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन झाले आहे. तर सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांचा माओवाद्यांशी थेट संबंध नसला तरी ते राव त्यांच्या संपर्कात आहेत, असे समोर आले आहे. त्यामुळे या सर्वांचा तपास होणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सोमवारी चारही आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ दिली.

-Ads-

सीपीआय (एम) या बंदी असलेल्या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या वरवरा राव, सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांना पहिल्यांदा अटक केलेल्याला 25 नोव्हेंबरला 90 दिवस पूर्ण झाले आहेत. त्या आत दोषारोपत्र दाखल न केल्यास त्यांना जामीन मिळू शकला असता. त्यामुळे आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास युएपीए कलमानुसार आणखी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शुक्रवारी (23 नोव्हेंबर) पोलिसांनी केली होती. त्यावर दोन्ही बाजुंचा युक्तिवाद झाल्यानंतर विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी मुदतवाढीचा अर्ज मंजूर केला.

सुरुवातीला अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीनंतर ऑगस्टमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याची वेळोवेळी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. आरोपींच्या घरांची झडती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात डेटा जप्त केला आहे. त्याचे विश्‍लेषण करण्यात येत असून कागदपत्रांच्या क्‍लोन कॉपी अद्याप मिळालेल्या नाहीत. या गुन्ह्यात आरोपींच्या सहभागाबाबत सखोल चौकशी करायची आहे. त्यासाठीच पोलीस कोठडीचे अधिकार देखील राखीव ठेवण्यात आले आहेत. आरोपी तपासास सहकार्य करीत नसून कोठडीत मारहाण केली असा खोटा आरोप पोलिसांवर करीत आहेत, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील अॅड. उज्वला पवार यांनी केला.

चुकीच्या मुद्यावर मुदतवाढीची मागणी
सुनावणी दरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या न्यायालयात युक्तिवाद केला होता की, नंतर अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींचा पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाशी संबंध नाही. त्यांचा हा युक्तिवाद न्या. चंद्रचूड यांच्या निकालात देखील नमूद आहे. जर नंतर अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींचा हत्येच्या कटात सहभाग नसेल तर दोषारोपत्र दाखल करण्याच्या मागणीत हा मुद्दा कसा मांडण्यात येतो? असा सवाल भारद्वाज यांचे वकील रागिनी अहुजा यांनी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)