माओवादी संपण्याच्या मार्गावर – रमणसिंह

रायपुर – छत्तीसगड मधील नक्षलवाद आणि माओवाद आता संपण्याच्या मार्गावर आहे असे त्या राज्याचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी म्हटले आहे. आपले दिवस भरले असल्याची कल्पना त्यांना आल्याने नैराश्‍यातून त्यांनी पुन्हा हल्ले सुरू केले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की राज्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण आता घटले आहे पण त्यांच्याकडून घडवल्या जाणाऱ्या आयईडी स्फोटांवर नियंत्रण ठेवणे मात्र एक जिकीरीचे काम बनले आहे. एखाद दुसरी घातपाती कारवाया करून ते आपले आव्हान कायम ठेऊ शकतील पण सुरक्षा दलांशी समोरासमोर लढण्याची क्षमता त्यांनी आता गमावली आहे. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी काही घातपाती कारवाया ते करतीलही पण त्यांच्यातील नैराश्‍य आता साफ दिसत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात गेल्या 13 मार्चला नक्षलवाद्यांनी आय ई डी स्फोटाचा वापर करून सीआरपीएफच्या नऊ जवानांची हत्या केली होती. त्याचे देशभर तीव्र पडसात उमटले होते. पण त्याविषयी स्वत: मुख्यमंत्र्यांनी मात्र कोणतेही विधान केले नव्हते. पण सुमारे आठवडभराच्या अवधीनंतर त्यांनी राज्यातील नक्षलवादी कारवायांविषयी हे वक्तव्य केले आहे. सुखमा, बिजापुर, आणि दंतेवाडा हे नक्षलप्रभावीत जिल्हे असून तेथे व्यापक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)