माओवादी संघटनेच्या संबंधावरून अटक केलेल्या चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

विशेष न्यायाधीश के.डी.वडणे यांचा आदेश

पुणे – माओवादी संघटनेशी संबंध असलेल्या कारणावरून अटक केलेल्या चौघांच्या पोलीस कोठडी 21 जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश के.डी.वडणे यांनी दिला आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात चौघांकडून 25 हजार जीबी डाटा प्राप्त झाला आहे. रोना विल्सनकडून 80 हजार रूपये मिळाले आहे. तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) नक्षली कारवाईमध्ये मारल्या गेलेल्याच्या स्मृतीपित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन केल्याची बाब पोलीस कोठडी दरम्यान उघड झाल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला.
सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सिताराम राऊत (30, पिंपळरोड, नागपूर मुळ रा. लाखापूर जि. चंद्रपूर) अशी पोलीस कोठडी वाढ झालेल्यांची नावे आहेत.
रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलींग शोमा सेन यांच्या सांगण्यावरून इतर आरोपी सामाजात जातीय तेढ, हिंसक घटना शासन विरोधी घडवून आणत असल्याचे निष्पन्न झाले आहे. युएपीए कायद्यामध्ये 30 दिवसांपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करता येऊ शकते. नवीन बाबू नावाचा जो नक्षलवादी पोलिसांच्या कारवाईमध्ये मारला गेला. त्याच्या स्मृतीपित्यर्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लेक्‍चर सिरीजचे आयोजन करून तेथील विद्यार्थ्यांचा माथी भडकविण्याचाही प्रयत्न झाल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या घर झडतीमध्ये सापडलेल्या इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईस मधील तब्बल 25 हजार जीबी डाटा तपासून त्याचे या गुन्ह्याचे दृष्टीने नेमके काय महत्व आहे. याबाबत तपास करायचा आहे. चौघांचाही सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधीत संघटनेशी प्रत्यक्ष संबंध असल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याची पाळे मुळे खोलवर असून त्या अनुषंगानेही तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान संवेदनशिल माहितीही समोर आली आहे. संशयीत आरोपींचा देशविघातक व राष्ट्रविरोधी कारवाईमध्ये सक्रीय सहभाग असल्याचे व माओवादी संघटनेशी संबध आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने चौघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली.
सरकारी वकिलांनी केलेल्या मागणीला बचाव पक्षाच्या वतीने ऍड. शाहिद अख्तर, ऍड. राहूल देशमुख, ऍड. सिध्दार्थ पाटील, ऍड. तौसीफ शेख, ऍड. कुमार कलेल यांनी विरोध केला. या प्रकरणामध्ये युएपीए ऍक्‍ट लागू होत नाही. स्थानीक पोलिसांना गुन्ह्याचा तपासच करत येत नसल्याबाबत मुद्या मांडण्यात आला. स्थानीक पोलिस युएपीएच्या ऍक्‍टमध्ये तपास करणार आहेत. याबाबतची माहिती राज्य सरकारला कळवावी लागते. तपासामध्ये कोणतीही प्रगती नाही. चौघांनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली असून दिलेल्या पोलिस कोठडीच्या कालवधीत त्यांना केवळ लॉकअपमध्ये ठेवून तपास करण्यात आला. तपासामध्ये कोणतीही प्रगती नाही. 25 हजार जीबी डाटा जप्त करण्यात आल्याबद्दल पोलीस जे सांगत आहेत. तो डाटा त्यांनी 17 एप्रिल रोजीच जप्त केला होता. त्यामुळे 17 एप्रिल पासून पोलिसांनी काय तपास केला असा प्रश्‍नही यावेळी उपस्थित करण्यात आला. 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एलगार परिषदेचेच्या संबंधाने तब्बल आठ दिवस उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलगार परिषदेमध्ये कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांनी भडकाऊ गाणी गायल्याचे म्हणले जात आहे. परंतु, ही संघटना कोणतीही प्रतिबंधीत संघटना नसून ती एक कला संघटना असल्याचा युक्तीवाद यावेळी करण्यात येऊन चौघांच्याही न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली.

ऍड. सुरेंद्र गडलींग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
या गुन्ह्यातील सुधीर गडलींग हे संयशीत आरोपी असून त्यांच्यावर एनजीओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांना डॉक्‍टरने सांगितलेली औषधे उपलब्ध नसल्याने ती औषधे पुरविण्यात येण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यांच्या समर्थनार्थ नागपूर येथून वकिलांची फौज आज पुण्यात आली होती.
त्यांच्याशी संवाद साधण्यात आल्यानंतर गडलींग हे गरीब आणी गरजू लोकांचे खटले विनाखर्च लढवीत होते. त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाईही चुकीच्या पध्दतीने करण्यात आली असल्याचेही यावेळी वकीलांनी सांगितले. दरम्यान त्यापैकी तीन वकिलांना ऍड. गडलिंग यांना भेटण्यास परवानगी दिली.

विल्सनच्या वकिलांचे वकीलपत्र मागे
रोना विल्सनच्या वतीने ऍड. बी.ए.आलुर यांनी वकीलपत्र दाखल केले होते. पहिल्यांदा न्यायालयात आणल्यानंतर ऍड. आलूर यांनी बाजूही मांडली होती. गुरूवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने रोना याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी रोना याच्या भाऊ आणि वडिल यांच्या सांगण्यावरून, गंभीर कारणावरून वकीलपत्र काढून घेतल्याचा अर्ज न्यायालयात केला. न्यायालयाने तो अर्ज मंजुर केल्याचे ऍड. आलुर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)