माऊली दाभाडे कॉंग्रेसवासी!

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित पक्षप्रवेश केला. त्यावेळी दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला.

राजकारण : मावळात राजकीय “घडी’ बिघडणार

वडगाव मावळ – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दुफळीचा फायदा विरोधकांना झाल्यामुळे पक्षाला आजपर्यंत मोठा फटका बसला. आता पक्षांतर्गत कारवाईचे बळी ठरलेले मावळ तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्येष्ठ नेते व सहकारमहर्षी माऊली दाभाडे यांनी गुरुवारी (दि. 12) मुंबईतील गांधीभवन येथे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माऊली दाभाडे यांच्या कॉंग्रेसप्रवेशामुळे प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळणार असली तरी मावळातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

-Ads-

माऊली दाभाडे यांच्यासोबत शांताराम लष्करी, तुकाराम असवले, नारायण ठाकर, विलास मालपोटे, बाबुराव येवले, प्रभाकर पडवळ यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाई जगताप, सचिन सावंत, पृथ्वीराज साठे, कॉंग्रेसचे मावळ तालुका अध्यक्षा बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, शांताराम नरवडे, रोहिदास वाळुंज, तुकाराम मालपोटे, खंडू तिकोणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, मावळ तालुक्‍यातील माऊली दाभाडे यांचे असंख्य कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी लवकरच मावळातील कान्हे येथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी दिली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल माऊली दाभाडे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निलंबित केले होते. त्यामुळे दाभाडे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. याशिवाय गेल्या काही काळात ते कॉंग्रेसवासी होणार म्हणून चर्चा रंगली होती. मात्र अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि अन्य नेत्यांच्या उपस्थित कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माऊली दाभाडे यांच्या कॉंग्रेसमधील प्रवेशामुळे कॉंग्रेसला बळकट होणार आहे.

मावळ तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडले असले तरी त्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसणार नाही. उलट सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळात मजबूत स्थितीत आहे.
– जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

माऊली दाभाडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कॉंग्रेसवासी झाले; हा विषय मावळवासियांसाठी निश्‍चितच मोठा नाही. त्यांच्या जाण्याने पक्षातील निष्ठावंत सुखावले आहेत.
– मदन बाफना, माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)