माऊलींच्या विश्रांतवड परिसरात राडारोडा

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीने गेल्या दोन वर्षांपूर्वी विकसित केलेले विश्रांतवड परिसर रामभरोसे आहे. तर या परिसरात राडारोडा पसरला आहे. तसेच या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मॉर्निंग वॉक ट्रॅकच्या आवती-भोवती झाडे-झुडपे उगवल्याने येथे येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
आळंदीतून जवळच असलेले श्री चांगदेव महाराज भेटीचे ठिकाण हे पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी नवरात्रीत माऊलींची पालखी चांगदेव भेटीसाठी जात असते. माऊलींनी जेव्हा निर्जीव अशी जड भिंत चालविली होती, तेव्हा चांगदेव महाराज वाघावरस्वार होऊन माऊलींच्या स्वागतासाठी येथे आले होते. तेव्हापासून या पवित्र ठिकाणाला विश्रांतवड असे नाव पडले होते. श्रीक्षेत्र अलंकापुरीतील हजेरी मारुती मंदिरामागे असणारा व नियमित भाविकांना दर्शन देणारा माऊलींचा पुरातन काळातील रथ गेल्या दोन वर्षांपासून विश्रांतवड या ठिकाणी सुरक्षितरित्या ठेवण्यात येऊन तत्कालीन विश्‍वस्त डॉ. प्रशांत सुरू, सुधीर पिंपळे, डॉ. शिवाजी मोहिते व इतर विश्‍वस्तांच्या प्रयत्नातून या परिसराला गत वैभव मिळवून दिले होते. तसेच या ठिकाण पर्यटन स्थळ व भाविकांसह नागरिकांनासाठी मॉर्निंग वॉक ट्रॅक करण्यात आला आहे. तसेच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेल्या भिंतीचे शिल्प तेथे उभारण्यात आले आहे. तसेच या वास्तूच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याची खोली, येथील स्वच्छता गृहांना कुलुप असते.तसेच येथे असणारी विविध प्रकारची शोभिवंत झाडे, तुळशी हे पाण्याअभावी सुकुन गेली आहेत.
दोन वर्षा पूर्वीच्या विश्‍वस्तांनी या पवित्र ठिकाणच्या वैभवात भर घालुन याचे महत्त्व वाढविण्यात आले होते. मात्र, यापरिसरात सध्या झाडे-झुडुपे, गवताचे साम्राज्य वाढले आहे. श्री ज्ञानेश्‍वर महाराजांनी चालविलेल्या जड भिंत शिल्पानजिक राडा -रोडा, टाकावू साहित्य यामुळे परिसराचे विद्रूपिकरणात वाढ होऊन त्याचे महत्त्व कमी होत आहे. तरी या वास्तुचे पावित्र देवस्थानाने राखावे असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

  • पालखी सोहळ्याची गुरूवारी (दि. 9) सांगता होताच विश्रांतवड परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सध्य परिस्थितीतीचा आढावा घेऊन आवश्‍यक
    त्या सुविधा नागरिक व भाविकांसाठी त्याठिकाणी उपलब्ध करून देऊ.
    विकास ढगे-पाटील, प्रमुख विश्‍वस्त,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)