माऊलींच्या पालखीचे 6 जुलैला प्रस्थान

पालखी तळांची पाहणी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील प्रवासातील जेजुरी, सासवडसह इतर पालखी तळांची पाहणी करण्यात आली. मुक्कामाचे तळावरील सेवा सुविधांसाठी मार्गावरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बैठका घेण्यात आल्या. देवस्थानने भाविकांना सेवा सुविधा देण्यास प्राधान्य देण्याचे सूचना केल्या आहेत. पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा महसूल प्रशासन संवाद साधण्यात आला आहे.

आळंदी -श्री ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे 6 जुलैला हरिनाम गजरात आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी दिली.
आळंदी पालखी सोहळा 2018 नियोजन आढावा आळंदी देवस्थानचे मासिक सभेत घेण्यात आला. पालखी मार्ग आणि तळांचे परिसरात सेवा सुविधांसाठी आळंदी संस्थानने पुणे, सातारा, सोलापूर प्रशासनास निवेदन देऊन विविध मागण्यांतून भाविक, नागरिकांना पायी वारी काळात गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यास कळविले असल्याचे प्रमुख विश्वस्त टिळक यांनी सांगितले आहे.

आळंदी संस्थानचे पुण्यात झालेल्या मासिक सभेत पालखी सोहळ्याचे प्रमुखपदी विधीतज्ञ विकास ढगे पाटील यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. आळंदीतून 6 जुलै ला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर 17व्या दिवशी श्रींचा पालखी सोहळा 22 जुलैला पंढरीला पोहचणार आहे. 23 जुलैला आषाढी एकादशी सोहळ्यात साजरी होईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी सोहळ्यातील घटकांनी पालखी मार्गाची सासवड ते पंढरपूर पाहणी केली आहे. या पाहणीत पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे आदींसह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळ्याचे कार्यक्रम, दिंड्या-दिंड्यांची उतरण्याची जागा, पालखी तळ पाहणी व नियोजन व्यवस्था, स्वच्छता, दिंड्या समस्या, भाविक, वारकरी सेवा सुविधा, वाहतूक व्यवस्था आदींची पाहणीत सूचना करण्यात आल्या. आळंदी देवस्थानचे वतीने कामाची लगबग सुरु झाली आहे. 23 जुलैला पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी साजरी होणार आहे. यासाठी रात्री ज्ञानेश्वरमहाराज पालखी पायी वारी प्रवास कार्यक्रमाचे नियोजनाची बैठक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)