माऊलींच्या पालखीचे यमाई शिवरीत स्वागत

खळद- संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे यमाई शिवरी येथे परतीच्या प्रवासात ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष आत्माराम कामथे, माजी उपसरपंच आण्णा कामथे, उपसरपंच विकास कामथे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ कामथे, नारायण कामथे, धनंजय कामथे, वासुदेव लिंभोरे, शरद कामथे, सतिश बनकर, विजय टेकवडे, युवराज कामथे, संतोष कामथे, बाळासाहेब कामथे, राजेंद्र कामथे आदी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याच्या पुढे सकाळपासूनच भाविक पायी चालत होते. या सर्वासाठी शिवरीतील ग्रामस्थांच्यावतीने चहा, नाश्‍त्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी एक वाजता संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे गावात आगमण झाले. त्यानंतर दोन वाजता माऊलींचा पालखी सोहळा आला. यावेळी शिवरी, खळद, वाळुंज, निळुंज, भाटमळवाडी, शिंदेवाडी व परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दुपारी 2.45 वा. पालखी सोहळा खळद, बोरावके मळा मार्गे संत सोपानकाकांच्या सासवड नगरीच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)