माऊलींच्या जयघोषाने पारगाव शिंगवे परिसर दिंडीमय

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होत असल्यामुळे शुक्रवारी संपूर्ण परिसर ज्ञानेश्वर माऊलींचा गजराने दुमदुमून गेला होता. वारकरी भजन-कीर्तनात रंगून गेल्याचे चित्र दिसत होते. सकाळीच्या वेळी पडणारी सूर्य किरणे अन्‌ धुक्‍याची नवलाई, हिरवीगार शिवारे अशा वातावरणात दिंड्या टाळ-मृदंगाच्या तालावर सुंदर अंभगांनी व ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने भक्तीरसात न्हाऊन निघाला.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानेश्वर डोळा पाहू ।।
तीर्थयात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलाचे नाव घेऊ ।।
संता संगे सेऊ । वासुदेव धनिवरी ।।
संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्ताने आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातून जाणाऱ्या दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होत असून वारकरी मंडळीचे गावोगावी स्वागत करण्यात आले. नागरिकांकडून वारकऱ्यांना चहा, नाष्टा दिला गेला. नगर, पुणे जिल्ह्यातील पायी दिंड्या पारगाव शिंगवे तसेच पाबळ मार्गाने आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत. हजारोंच्या संख्येने दिंड्या आल्यामुळे परिसर भक्तीमय झाला आहे. मुक्‍कामाच्या ठिकाणी रात्री भजन-कीर्तनात वारकरी रंगून गेले होते.
ऊन व थंडीची तमा न बाळगता वारकऱ्यांना आस लागते ती ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाची. माऊलींच्या दर्शनाने जीवन सार्थक होत असल्याने मनामध्ये असलेले दुःख, चिंता, संसाराचा विसर पडून ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करून अनेक गावच्या दिंड्या आळंदी मार्गस्थ झाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)