माउली मंदिर उजळले लक्ष लक्ष दिव्यांनी

आळंदी- दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत गुरुवारी (दि. 8) सायंकाळी “स्वकाम “सेवे’च्या कार्यकर्त्यांच्या शेकडो हातांनी पणत्या, वाती व तेलाच्या बाटल्या घेत अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण माऊली मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकले. त्यामुळे तमोत्सो मा ज्योतिर्गमय, तिमिरातुनि तेजाकडे… या उक्तीप्रमाणे मंदिराच्या अबोल भिंती, ओवऱ्या, पायऱ्या, मंदिरातील विविध देवतांची छोटी-छोटी मंदिरे आणि संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक रांगोळ्या आणि पुष्पसजावटीने जणू उजळून निघाला होता. गुरुवार हा माउलींचा वार असतो आणि यावेळी दिवाळी पाडवा म्हणजेच बलीप्रतिपदा गुरुवारी (दि. 8) होता, त्यामुळे तर या दीपोत्सवासाठी एक सुंदर योग जुळून आला होता. “स्वकाम सेवा मंडळ’ गेली पंधरा वर्षे हा माउली मंदिरात पाडव्याच्या दिवशी दीपोत्सवाचा उपक्रम राबवत असल्याचे संस्थापक डॉ.सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर यांनी सांगितले. यावेळी स्वकाम सेवेचे शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)