माउली मंदिरात संत एकनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना

आळंदी- माउली मंदिरातील शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पार यांचे जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होते. आज (दि. 13) संत एकनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पहाटे 4 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पहाटे 6 वाजता महाभिषेक झाला. सकाळी 7 वाजता मूर्ती प्रतिष्ठापना विधीस मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. सकाळी 10 ते 12 हभप शांतिब्रह्म मारुती महाराज कुर्हेकर यांचे हरिकीर्तन झाले. दुपारी 12.30 वाजता श्रीसंत एकनाथ महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तद्‌नंतर दुपारी 1 ते 3 आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याबरोबरच आज (दि. 13) माउली मंदिरात नित्याचे धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर दुपारी 3.30 ते 4 हभप नितीन महाराज गोसावी (नाथ महाराजांचे वंशज पैठण) यांचे प्रवचन झाले. सांयकाळी 4 ते 5 स्वानंद सुखनिवाशी श्रीसद्‌गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचे प्रवचन झाले आणि सांयकाळी 5 ते 6.30 वाजता श्री ज्ञानेश्वर व एकनाथ महाराज हरिपाठ, त्यानंतर सांयकाळी 6.30 ते 8.30 हभप योगीराज महाराज पैठणकर यांच्या हरिकीर्तनानंतर रात्री 9 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी वनवाशी दिंडीचे माउली मंदिरात आगमन झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)