माउली मंदिरात संजीवन समाधी सोहळ्याची लगबग

30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत रंगणार सोहळा

आळंदी- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार (दि. 30) ते शुक्रवार (दि. 7 डिसेंबर) या कालावधीत होत आहे. त्यादृष्टीने कार्तिकी वारीच्या तयारीची लगबग आत्तापासूनच देवस्थांनेसुरू केल्याची माहिती देवस्थांचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी दिली.
दरवर्षी माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. यंदा कार्तिकी वद्य अष्टमीला शुक्रवारी (दि. 30) गुरू हैबतराव बाबांच्या पायरी पुजनाने सकाळी 7 ते 9 या वेळेत हरिनामाच्या गजरात सुरुवात होईल.त्यानंतर आठ दिवस माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह सोहळा पार पडणार असल्याचे ढगे पाटील यांनी सांगितले.
संजीव समाधी सोहळ्याचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे; शुक्रवार (दि. 30) : हैबतराव बाबांच्या पायरी पूजननाने सोहळ्यास प्रारंभ (सकाळी 7 ते 9). सोमवारी (दि. 3 डिसेंबर) : एकादशीनिमित्त (मध्यरात्री) अभिषेक, दुपारी 1 वाजता नगरप्रदक्षिणेस सुरुवात व रात्री 12 ते 2 जागर. मंगळवारी (दि. 4) द्वादशीनिमि अभिषेक, रात्री 12 ते 2 शासकीय महापूजा, पहाटे 3. 30 ते 4 पालखी नगरप्रदक्षिणेस सुरुवात दुपारी 4 ते 7 रथोत्सवाची सांगता, महाप्रसादाचे वाटप रात्री 11 ते12. बुधवारी (दि. 5 ) : संजीवन समाधीदिन सोहळा, संत नामदेवांच्या वंशजांकडून पूजा (सकाळी 7 ते 9), मानाचे किर्तन (7. 30 ते 9. 30), नामदास महाराजांचे किर्तन (सकाळी 10 ते 12), घंटानाद व पुष्पवृष्टी (दुपारी 12). शुक्रवारी (दि. 7) पालखी नगरप्रदक्षिणा, सांगता रात्री 9. 30 वाजता होईल.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)