माउली भक्तांना हिंदी चित्रपट सृष्टीत संधी देणार : नीरज पाठक

आळंदी, दि. 21 (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र अलंकापुरीत असणाऱ्या माउली भक्त (मराठी कलाकारांना) हिंदी चित्रपट सृष्टीतही कलेची संधी देणार असल्याचे प्रतिपादन नामवंत हिंदी चित्रपट लेखक, दिग्दर्शक नीरज पाठक यांनी केले. गुरुवारी (दि. 20) त्यांनी माउलींच्या संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

संजीवन समाधी दर्शनानंतर देवस्थानच्या वतीने प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर ऊर्फ माउली वीर यांचे हस्ते नीरज पाठक यांना शाल, श्रीफळ आणि माउलींची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पुढील काळात मी आळंदीला कधीच विसरू शकणार नाही, तसेच येथील मराठी माउली भक्तांना हिंदी चित्रपट सृष्टीत संधी दिल्याशिवायही राहणार नाही, असेही पाठक यांनी सांगितले.
यावेळी चित्रपट निर्माते कलाकार नवराज विश्वकर्मा, निर्माते आप्पासाहेब पांचाळ, दत्ता बनसोडे, नानजीभाई ठक्कर (ठाणावाला) प्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर दिवाणे, हनुमंत शिंदे, जनहितचे अर्जुन मेदनकर, संतोष काशिद, माउली कुऱ्हाडे व मंडुबाबा पालवे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्‌नंतर नानजीभाई ठक्कर प्रतिष्ठानच्या संपर्क कार्यालयात मनोहर दिवाणे यांच्या हस्ते नीरज पाठक यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)