माईंडस्पार्कसाठी अभियांत्रिकी महाविद्यालये सज्ज

20 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

28 ते 30 सप्टेंबरदरम्यान परिषद

प्रभात वृत्तसेवा
पुणे: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ही आशियातील तिसऱ्या क्रमांकाची स्वायत्त संस्था असून संपूर्ण भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या तांत्रिक महोत्सवांपैकी एक माईंडस्पार्स्क ही परिषद हे महाविद्यालय आयोजित करते. माईंडस्पार्स्क हा पूर्णपणे विद्यार्थी नियोजित महोत्सव असून, देशातील कुशाग्र मुलांना नवीन दिशा देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी माईंडस्पार्स्क खूप मोठा मंच उपलब्ध करून देत असतो.

सन 2007 मध्ये प्रारंभ झालेल्या माईंडस्पार्स्कमध्ये 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. यंदाच्या वर्षी 12व्या आवृत्तीमध्ये युनेस्को, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया (UNESCO Digitial India, Skill India) यांच्या साहाय्याने माईंडस्पार्स्क 60 पेक्षाही जास्त कार्यक्रम आयोजित करत आहे. इम्बायबिंग टेक्‍नसी (Imbibing Technacy) या संकल्पनेवर आधारित यंदाचं माईंडस्पार्स्क-18 हे 28, 29 व 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजीत करण्यात आले आहे.

माईंडस्पार्स्क-18 व कॅडकॉम्प सिस्टीम्स (Kadkomp System) मिळून यावर्षी National Students Conference on Inclusive Research and Innovation (NSCIRI) याची प्रथमावृत्ती सादर करत आहे. आयईईई (IEEE) पुणे यांच्या सहयोगाने ही कॉन्फरन्स आयोजित केली आहे. ही कॉन्फरन्स पदवीच्या आणि पदव्युत्तर शिक्षण झालेल्या मुलांना एक खुले व्यासपीठ प्रदान करीत आहे. यासाठी ऍबस्ट्रॅक्‍ट सबमिशन मोफत असून ते 10 सप्टेंबर पर्यंत सादर करायचे आहे. ही कॉन्फरन्स 7 विभागात विभागली आहे.

सीडीके ग्लोबल या कंपनीचे माईंडस्पार्स्क-18 साठी टायटल स्पॉन्सर म्हणून सहकार्य लाभले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये रुजवण्यासाठी व तांत्रिक साक्षरता निर्माण करण्यासाठी माईंडस्पार्स्कने अनेक वर्कशॉप्सचे आयोजन केले आहे. यामध्ये फ्युरियस फाईव्ह रोबोटिक्‍स, ऍन्ड्रॉईड ऍप डेव्हलपमेंट, ब्रिज डिझायनिंग ऍण्ड ऍनालिसीस, ड्रोन मेकींग, इथिकल हॅकिंग, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, मशिन लर्निंग, पीटीसी क्रियो या वर्कशॉप्सचा समावेश आहे.
मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी याची निश्‍चितच मदत होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी मिडीया पार्टनर म्हणून दै. प्रभात काम करत आहे.

अधिक माहितीसाठी www.mind-spark.org  या संकेतस्थळाला भेट द्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)