मांढर गाव पावसाच्या स्वागतासाठी सज्ज

जल व मृदा संधारणासाठी गावकऱ्यांनी दाखविली एकजूट

काळदरी – पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये सहभागी होऊन जल व मृदा संधारणाची लक्षणीय कामे मांढर गावात करण्यात आली. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच मुरणार असा पक्का विश्वास गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता. गावाने पावसाच्या स्वागताची पूर्ण केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

वॉटर कप स्पर्धा सुरु झाल्यापासून गावाने स्पर्धेची कामे सुरु केली. स्पर्धे दरम्यान शोषखड्डे, वनौषधींची झाडांची रोपवाटिका, जल बचतीचे कामे, गावाला गावाचा वॉटर बजेट, आगपेटीमुक्त शिवार व माती परीक्षण आदी कामे अहोरात्र श्रमदान करून पूर्ण केलीे. तर मशीनद्वारे नाला खोलीकरण, ओढा खोलीकरण, सलग समतल चर, गाळ काढणे आदी कामे पूर्ण केली असल्याची माहिती सरपंच सचिन शिंदे यांनी दिली. गावाने या कामामधून वार्षिक अंदाजे 2.05 कोटी लीटर पाणी मुरविण्याची क्षमता निर्माण केलेली आहे.

या प्रकारे गावाने तालुक्‍यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या लोकांनी ,जलमित्रांनी श्रमदान व आर्थिक मदत करुन गावकऱ्यांच्या कार्यात सहभग नोंदवला. या कार्याचा वृत्तांत न्यूज चॅनलने प्रसारित करत जलसंधारण कामांचे कौतुक केले. गावात करण्यात आलेल्या कामामुळे पावसाचे पाणी साठविण्यास नक्कीच मदत होणार आहे. यामुळे गाव परिसरात तयार करण्यात आलेल्या खड्डयात पाणी मुरून भूजल पातळी वाढल्याने टंचाई भासणार नाही, हे निश्‍चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)