मांढरदेव यात्रास्थळाची जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पाहणी

मांढरदेव : मांढरदेव यात्रा स्थळाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख.

मांढरदेव, दि. 11 (वार्ताहर) – महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर लाखो भाविकांच्या श्रद्धाथान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळूबाई देवीची यात्रा 20, ते 22 जानेवारी दरम्यान होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी मांढरदेवी यात्रा परिसर व काळूबाई मंदिर परिसराची पाहणी केली व संबंधितांना उपयुक्त सूचना केल्या.
मांढरदेव यात्रेला भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होत असते. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार मांढरदेव येथे घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी आज जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी मांढरदेव येथील यात्रा स्थळाची पाहणी केली व पोलिस प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला व उपयुक्त सूचना केल्या. यात्रा काळात मंदिराकडे जाणारा चढणीचा मार्ग व दर्शन घेतल्यानंतर परतीचा मार्ग, दर्शन रांगा, यात्रा कालावधीमध्ये वाहनांचे होणारे पार्किंग जागा, पार्किंग व मंदिराकडे जाणारे मार्ग, मंदिर परिसर यांची पाहणी आज पोलीस प्रमुखांनी केली. यात्रा कालावधीमध्ये मांढरदेव येथे पशुहत्या करणे, झाडाला लिंबे, खिळे, बाहुल्या ठोकणे, वाद्य वाजवणे, नारळ फोडणे, तेल वाहणे, मद्य विक्री करणे आदी बाबींवर निर्बंध आहेत. निर्बंध असलेल्या बाबी होऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशा प्रकारच्या सूचना पोलीस प्रमुखांनी संबंधितांना दिल्या. यात्रा कालावधीमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस निरीक्षक बेदरे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर शिरसागर, शैलेंद्र शिरसागर, उपसरपंच शंकर मांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)