मांढरदेवच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

मांढरदेव, दि. 6 (वार्ताहर) – नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल मांढरदेवच्या खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले. या खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा संघामध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य आनंदा कोचळे याने 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. शंतनू जाधव याने 110 मीटर अडथळा या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात विशाखा संजय साळुंखे हिने 3000 मीटर व क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथम तर 1500 मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. प्रतीक्षा ज्ञानेश्वर मांढरे हिने 3000 मीटर धावणे द्वितीय क्रमांक तर क्रॉस कंट्री स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवला. सेजल पंढरीनाथ मांढरे हिने 800 मीटर धावणे द्वितीय क्रमांक तर क्रॉस कंट्री स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात सुशांत मनोहर जधे याने 1500 मीटर प्रथम तर क्रॉसकंट्री स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. 3000 मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर 17 वर्षाखालील मुलांच्या रिले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंची कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेकरिता सातारा जिल्हा संघात निवड झालेली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक राजगुरू कोचळे व धोंडीराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, मांढरदेवच्या सरपंच अनिता मांढरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान एरंडे सर्व शिक्षक ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)