मांढरदेवच्या खेळाडूंचे राज्य स्पर्धेत यश

मांढरदेव – महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्‍स असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत मांढरदेव येथील ऍथलेटिक्‍स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले. या स्पर्धा मुंबई व डेरवन (रत्नागिरी) येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेत 20 वर्षाखालील गटात आदित्य शिवाजी भोसले याने 3000 मीटर स्टिपलचेस या प्रकारात द्वितीय, प्रतिक शिवाजी उंबरकर याने 5000 मीटर धावणे प्रकारात तृतीय, 18 वर्षाखालील मुलांच्या गटात हर्षवर्धन संतोष दबडे याने 2000 मीटर स्टिपलचेस या प्रकारात द्वितीय तर 16 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य आनंदा कोचळे याने 400 मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेत महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या पश्‍चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेकरीता आदित्य भोसले, हर्षवर्धन दबडे व आदित्य कोचले यांची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक राजगुरु कोचळे व धोंडीराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंच्या यशाबद्दल सातारा जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, सचिव संजय वाटेगावकर, काळेश्‍वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, उपाध्यक्ष सुखदेव मांढरे, सचिव तात्याबा मांढरे, सर्व संचालक, मांढरदेवच्या सरपंच अनिता मांढरे, उपसरपंच शंकर मांढरे, मुख्याध्यापक सचिन मुल्ला, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)