मांढरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार

काळदरी- राज्य शासनाच्या माध्यमातून मांढर गावात जास्तीत जास्त निधी दिला जाईल. यात प्रामुख्याने गाव व परिसरातील रस्ते तसेच गटार योजना आदी कामांना प्राधान्य देऊन सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल. तसेच नूतन सरपंच सचिन शिंदे यांनी नियोजन करुन गावचा मोठ्या प्रमाणावर विकास करावा, असे प्रतिपादन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
सचिन शिंदे बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव व पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे यांनी अभिनंदन केले. पुरंदर तालुक्‍यातील मांढर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पापळ यांचा कार्यकाल पुर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत सचिन शिंदे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी वीरकुमार गायकवाड यांनी केली. यावेळी ग्रामसेवक रोहित अभंग व तलाठी एन. पी. अवसरमोल यांनी सहाय्यक म्हणुन काम केले. यावेळी जयवंत मांढरे, उपसरपंच अनिता शिर्के, ग्रामपंचायत सदस्य भरत काशीद, रुपाली मोरे, सजोली शिंदे, वैशाली पापळ, भानुदास पापळ, चंद्रकला शिर्के, तानाजी शिर्के, रामदास शिंदे, आदीसह टोणपेवाडी, शिंदेवाडी, उपळ वस्ती येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी गट तट बाजूला ठेवून गावाचा विकास करणार आहे. समाजोपयोगी उपक्रम, स्त्री जन्माचे स्वागत, शासन योजनांचा सर्वसामान्यांना लाभ देणे आदी कामे करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना सचिन शिंदे यांनी सांगितले. सचिन शिंदे यांच्या माध्यमातून शिंदेवाडीला सरपंच पद पहिल्यांदाच मिळाले आहे. तानाजी शिर्के यांनी सूत्रसंचालन केले तर, रमेश पापळ यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
203 :thumbsup: Thumbs up
37 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)