मांढरचे सरपंच सचिन शिंदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

परिंचे- पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषद पुणे जिल्हा यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार पुरंदर तालुक्‍यातील मांढरचे सरपंच सचिन शिंदे यांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक जयंत पाटील यांच्या हस्ते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार विलास लांडे, राज्य संघटक कैलास गोरे, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, पुणे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, उपाध्यक्ष अमोल जगताप, निमंत्रक भाऊसाहेब मरगळे आदी उपस्थित होते. मांढर गावात केलेल्या विकासकामांची दखल घेवून पुरंदर तालुक्‍यातून सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी सांगितले. मांढर गावातील ग्रामस्थ, महिला आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठबळामुळे हा पुरस्कार मिळाला असून गावाला दुष्काळमुक्त करण्याबरोबरच सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात मांढर गावात विकासकामांच्या सोबतच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार असल्याचे मांढरचे सरपंच शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच मंगल मोरे, प्रदीप खोमणे, जयवंत मांढरे, उपसरपंच रुपाली मोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य भरत काशीद, चंद्रकला शिर्के, भानुदास पापळ, ग्रामसेवक शशांक सावंत, आत्माराम शिंदे, पांडुरंग शिर्के आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)