मांडूळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले

पुणे – मांडूळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी स्वामी नारायण मंदिराजवळ पकडले. त्यांच्याकडून मांडूळ जप्त केला आहे. त्यांचा हा व्यवहार सुमारे 12 लाख रुपयांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात दीपक रामचंद्र साळुंखे (23, रा. गुळची, ता. पुरंदर) याच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दोघेजण मांडूळ विक्रीसाठी स्वामी नारायण मंदिराजवळ येणार असून 12 लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी कृष्णा बढे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अल्पवयीन मुलाकडे असलेल्या बॅगमध्ये चार फुट लांबीचे आणि दोन किलो वजन असलेले मांडून आढळले. दीपक साळुंखेने हे मांडूळ त्याच्या शेतातून पकडून आणले होते. राज्यात व देशभरात अंधश्रद्धेतून मांडूळाला मोठी मागणी असते. त्यातून भरपूर पैसे मिळत असल्याने तस्करीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या दोघांच्या ताब्यातून घेतलेले मांडूळ कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहायलयाच्या अनाथालयात ठेवण्यात आले आहे. सहाय्यक निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा बढे, सर्पैराज देशमुख, सचिन पवार, वुैंदन शिंदे, गणेश चिंचकर,म महेश मंडलीक, राहूल तांबे, अभिजित रत्नपारखी यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)