मांडूळ विकणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी – बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे करण्यात आली.

याप्रकरणी हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर), आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, भीमनगर, झोपडपट्टी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अभय महादेव भवारी (वय-38, रा. किरकीटवाडी, खडकवासला) यांनी फिर्याद दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक रस्त्यावरील मोशी येथे काळजे पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती मांडूळ विक्रीसाठी आल्याचे एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ तीन फूट लांब आणि अडीच किलो वजन असलेले एक मांडूळ आढळून आले. त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)