मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक

मांडूळाची विक्री करण्यासाठी उस्मानाबाद येथून आलेल्या तिघांना विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. वनसंरक्षक श्रीमती दया डोमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेश शिवाजी अवसरे(23),समाधान संजय गोडगे(27),पांडुरंग धुळदेव डाकवाले(32तिघेही रा.परांडा,उस्मानाबाद)या तिघांना सापळा रचून अटक करण्यात आली.अटक आरोपींना 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी शेखर खराडे यांना धानोरी परिसरात तीन व्यक्ती मांडूळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार धानोरी शंभर एकर परिसरात एका स्कॉंरपियो गाडीत तीन संशयित इसम मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपासात त्यांच्या गाडीत सुमारे साडे तीन फूट लांबीचा मांडूळ मिळून आला. याची माहिती वन विभागाला कळवण्यात आली.
परिमंडळ चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे, पोलीस निरीक्षक संगिता पाटील, गुन्हे निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस हवालदार उत्तम कदम, सुनील खंडागळे, पोलीस कर्मचारी विनायक रामाणे, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे, अशोक शेलार यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)