मांडुळाची तस्करी करणारी टोळी जेरबंद

पिंपरी – निगडी पोलिसांनी मांडुळाची तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.

सैफ रौफ शेख (वय-23, रा. गणेशनगर, वडगाव), प्रमोद सुनील पाटील (वय-21, रा. खराडी, पुणे), दिनेश विजय नायर (वय-27, रा. येरवडा पुणे) व अमर रामदास उदमाले (वय-31, रा. दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजय सावंत शिंदे (वय-21, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरकडे जाणाऱ्या रोडवरील तिरुपती हॉटेल जवळ चार इसम हे मांडूळ सापाची विक्री करण्यासाठी आल्याची खबर पोलीस शिपाई मिसाळ यांना मिळाली. त्यानुसार निगडी पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या हातातील बॅगेत 50 इंच लांबीचे व 9 इंच रुंद व तीन किलो वजनाचे मांडूळ आढळून आले. आरोपी हे त्याची विक्री करण्यासाठी निगडी येथे आले होते. त्यानुसार आरोपींवर वन्यजीव संरक्षण 1972 कायद्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे व कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, संदीप पाटील, विलास केकाण, सतीष ढोले, विजय बोडके, राहुल मिसाळ, सोमनाथ दिवटे, स्वामीनाथ जाधव, रमेश मावसकर, गणेश शिंदे यांनी ही कारवाई केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)