मांडवणमध्येमाजी पोलीस पाटलाचा मृतदेह आढळला

श्रीगोंदा – तालुक्‍यातील खांडगाव येथील माजी पोलीस पाटील मोहन काशिनाथ टकले(वय67) यांचा मृतदेह रविवारी सकाळी मांडवगण शिवारात आढळला. 13 ऑगस्टला चतूर हरिभाऊ दरंदले (रा. आंबिलवाडी, ता. नगर) हेसकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मांडवगण फाटा येथील त्यांच्या मालकीच्या गट नं 527 मधील शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेहोते. त्यांना त्यांच्या शेतातील विहिरीजवळ एक बेवारस मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फोन करून खबर दिली. त्यांच्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झालेली व्यक्‍ती मोहन काशिनाथ टकलेअसल्याचे निष्पन्न झाले. 5 ऑगस्ट रोजी खांडगाव येथून सकाळी त्यांच्या घरातून औषध आणण्यासाठी टकले घराबाहेर पडले होते. ते परत घरी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा रमेश मोहन टकले यांनी आपले वडील हरवल्याबाबत 11 ऑगस्टला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली होती. रविवारी सकाळी हा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)