मांडवगण फराटा येथील शाळेत वृक्षदिंडी

मांडवगण फराटा- विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत अध्यात्मिक ज्ञान, संस्काराची जडणघडण याबरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि वृक्षाची होणारी कत्तल रोखण्याबाबत बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण याचा संदेश देणारी वृक्ष दिंडी मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने काढण्यात आली.
यावेळी शाळेतील बालचिमुकल्यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात “ज्ञानोबा, तुकारामाच्या जयघोषात राम कृष्ण हरी’ या नामघोषात अवघा मांडवगण फराटा परिसर दुमदुमला. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन करणे गरजेचे का आहे? याबाबतची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिमामा फराटे, मोहन शेलार, श्रीकृष्ण भोसले, मुख्याध्यापक सतीश नागवडे, भागवत कारखेले, अप्पा संकपाळ आदी उपस्थित होते. ज्योती कर्डीले, सुजाता वाळके, अर्चना जगताप, पूनम चव्हाण यांनी दिंडी यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)