मांडवगण फराटामध्ये दोन गटात हाणामारी

शिरूर – शिरूर तालुक्‍यातील मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्ययालयाच्या पाठीमागे पाईपलाईन लिकेज (गळती) झाल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
हा प्रकार शनिवारी (दि.24) दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. यात दोन्ही गटाचे लोक जखमी झाले असून दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. यात गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न, हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले आहेत. बाळासाहेब किसनराव फराटे (रा. मांडवगण, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर बाळाराहेब फराटे, संतोष बाळासाहेब फराटे, प्रदीप काकासाहेब फराटे, बाळासाहेब माधवराव फराटे, अमोल नानासाहेब फराटे (सर्व रा. मांडवगण, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, संशयित आरोपी हे पाईपलाईनची गळती काढण्याकरीता फिर्यादीच्या शेतामध्ये गेले. यावेळी पाईपलाईन जोडू द्या. तसेच आमचा ऊस जळायला लागला आहे, असे म्हणाले. या कारणावरून वरील आरोपींनी लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्‍यात मारहाण केली. यावेळी एकाने फिर्यादीच्या बोटाला आणि पोटाचा चावा घेतला. तर एकाने पिस्तुल काढ असे म्हणून फिर्यादीवर पिस्तुल रोखले. तर, दुसऱ्या घटनेत संतोष बाळासाहेब फराटे (वय 40, धंदा शेती, रा. मांडवगण फराटा, इनामदारवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनीही फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव किसन फराटे, सागर महादेव फराटे, संपत किसन फराटे, राम किसन फराटे, बाळासाहेब किसनराव फराटे, समीर मधन फराटे आणि चार ते पाच व्यक्‍ती (सर्व रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मौजे मांडवगण फराटा येथील वाघेश्वर विद्यालयाच्या पाठीमागील शेतजमीनीत पाईपलाईन हे सारखे लिकेज (गळती) होते. म्हणून त्याठिकाणी दुरूस्ती करीता फिर्यादी यांनी जेसीबीने पाईपलाईन खोदली. ती दुरूस्ती करताना संशयित आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच फिर्यादीस विचारणा केली की, “तुम्ही शिवीगाळ का करता?’ यावेळी आरोपी यांनी फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ यांना लोखंडी पाईप, खोरे, दांडक्‍याने मारहाण केली. फिर्यादीच्या उजव्या हाताच्या खांदा निखळला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)