मांडवगण फराटात खून, दोघांना अटक

  • बारा दिवसांपूर्वी ळाला होता मृतदेह
  • जमिनीच्या वादातून घडलेली घटना

शिरूर – मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या बेपत्ता मृतदेहाची ओळख पटली असून पोलीस तपासात त्याचा जमिनीच्या वादातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
बाळासाहेब सोनबा मुरकुटे (वय 55, रा. शिरसाटवाडी ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या खून प्रकरणी योगेश दत्तात्रय मुरकुटे, भाऊसाहेब सर्जेराव माळवदकर (दोघे रा. मुरकुटे नगर, ता. हवेली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा येथील भीमानदी पात्रात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होते. याबाबत मांडवगणचे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर हा मृत्यू पाण्यात बुडुन झाल्याचे निष्पन्न झाले होते.
हा मृतदेह व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता व्यक्‍ती बाळासाहेब सोनबा मुरकुटे यांच्याशी वर्णन मिळतेजुळते असल्याचे आढळुन आल्याने त्याचया नातेवाईकांनी वस्तू व फोटो पाहून हा मृतदेह बाळासाहेब यांचाच असल्याचे ओळखले. तपासादरम्यान बाळासाहेब यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता योगेश दत्ताञय मुरकुटे व भाउसाहेब माळवदकर यांच्याशी बाळासाहेबाचा शिरसटवाडी येथील जमीनीवरुन दिवाणी न्यायालयात दावा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने योगेश व भाउसाहेब माळवदकर यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की, बाळासाहेब मुरकुटे याचे सोबत शेतीच्या कारणावरुन वाद होते. वारंवार विनंती करुनही केस मागे घेत नव्हता. 29 ऑगस्टला शिवाजीनगर कोर्टातील तारीख झाल्यानंतर वाद बसवून मिटवू असा बहाणा करून त्याच्याकडील सेलेरियो गाडीत बसवून लोणीकंद माथ्याजवळ व वडगाव बांडे या दोन ठिकाणी अति दारू पाजून त्यास हाता-बुक्‍क्‍यांनी मारुन वडगाव बांडे येथील भीमा नदीपात्रात नदीच्या पुलावरून ढकलून देऊन खून करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली.
हा गुन्हा उघडकीस होण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, सहायक फौजदार दिलीप जाधवर, मुकुंद आयाचित, चंदनशिव, धीरज जाधव, विजय कांचन यांनी कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)