मांडवगणला अन्न, औषध प्रशासनाची धाड

मांडवगण फराटा- शिरूर तालुक्‍यातील मांडवगण फराटा येथे अन्न आणि औषध प्रशासनाने अचानक धाड टाकली. यात प्रशासनाच्या हाती काहीच लागले नाही मात्र, या धाडीमुळे
अनेकांचे धाबे दणाणल्याचे चिञ पाहावयास मिळाले. मांडवगण फराटा हे लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठे गाव असल्याने येथील सर्व किराणा दुकाने, हॉटेल, औषध दुकाने आदी दिवसभर सुरु असतात. परंतु शनिवारी (दि.6) केळ एक मिठाईचे दुकान चालू असल्याने ही धाड ठरवून होती की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला.
महेंद्र पाटील या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही तपासणी करण्यात आली. यामध्ये केवळ एकाच दुकानाची तक्रार आली असल्यामुळे आम्ही या मिठाईच्या दुकानाची तपासणी केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सचिव अंकुश जगताप यांनी अन्न आणि औषध अधिकाऱ्यांना बाकीची दुकाने बंद का आहेत? तसेच इतर मिठाईची दुकाने आणि हॉटेल्स तुम्ही येण्याच्या आधीच बंद कशी काय झाली? अशी विचारणा केली.
तपासणी अधिकारी येण्याच्या अगोदरच सर्व दुकाने, हॉटेल्स बंद होतात. याचा अर्थ भेसळयुक्त पदार्थ आणि भेसळयुक्त किराणा माल मांडवगण फराटामध्ये असतो का?. केवळ एकच दुकान सुरु राहते. याचा अर्थ बाकीच्या दुकानदारांना तपासणी अधिकारी येण्याची पूर्व कल्पना होती की काय? ही बाब संशयास्पद आहे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी उपस्थित केला आहे. परंतु या प्रश्नावर अधिकारी काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी महेंद्र पाटील म्हणाले की, तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तसेच भेसळसंबधी काही माहिती द्यायची असल्यास जिल्हा अन्न आणि भेसळ कार्यालयात फोन करून माहिती घ्या.

  • ग्रामस्थांच्या प्रश्‍नांमुळे अधिकाऱ्यांचे पलायन
    गुटखा विक्री सर्रासपणे चालू आहे. त्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांना उपस्थित केला. मांडवगण फराटा पोलीस स्टेशनचे अधिकारी जगदाळे आबा म्हणाले, आम्हाला गैरप्रकार दाखवा. आम्ही लगेच कारवाई करु. परंतु अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र काहीच उत्तर देत नव्हते. यावेळी एका दुध डेअरीची सुद्धा तपासणी केली. या दोन्ही तपासणीत काय सापडले? ते मात्र समजू शकले नाही. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सरसकट सर्वांची तपासणी करण्यास सांगितले. महिन्यातून एकदा तरी तपासणी करण्यात आली पाहिजे. परंतु दुकानदारांना काही न कळता कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आज केवळ एकाच दुकानावर कारवाई केली. इतर दुकाने बंद असण्याचे काय गौडबंगाल आहे? याची लोकांमध्ये चर्चा सुरू होती. अनेक लोकांनी प्रश्नांचा भडिमार करताच अधिकारी तेथून निघून गेले. एकाच दुकानावर कारवाई होताना बाकीचे बंद कसे काय? याची सविस्तर चौकशी व्हावी, असे अशी ग्रामस्थांनी मागणी केली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)