मांडवगणच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत

वडीलांनी दिली होती अपहरणाची फिर्याद

श्रीगोंदा- तालुक्‍यातील मांडवगण येथील महांडूळवाडी शिवारातील गेल्या दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आशा अरुण घोडके (वय 14) हिचा मंगळवारी तिच्या घराशेजारी असणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळून आला. आशा घोडके हिच्या अपहरणाची फिर्याद तिचे वडील अरुण घोडके यांनी श्रीगोंदा पोलिसात दाखल केली होती.

याबाबत सविस्तर असे कि, अरुण घोडके हे मांडवगण येथील महांडूळवाडी शिवारातील रहिवासी आहेत. मागील दोन दिवसांपासून घोडके यांची बेपत्ता असलेली चौदा वर्षीय मुलगी आशा अरुण घोडके हिचे अपहरणाची शंका आल्याने त्याबाबतची फिर्याद श्रीगोंदा पोलिसांत नोंदवली होती. मंगळवारी (दि.29) रघुनाथ तुकाराम घोडके यांचे विहिरीत आशा हिचा मृतदेह मिळून आला आहे.
रघुनाथ तुकाराम घोडके यांनी पोलिसांनी खबर दिली की, अरुण घोडके हा माझ्या शेजारी रहात आहे, तसेच आशा ही बेपत्ता झाली आहे. आज मी माझ्या शेतात गेलो होतो आणि विहिरीवर जाऊन विहिरीत पाळलेल्या माशांना खाऊ टाकत असताना मयत आशा हिचा मृतदेह विहिरीत तरंगत असताना दिसला म्हणून आरडाओरड करून लोकांना बोलावून घेतले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. मृत आशा हिचे अपहरण कोणी केले, तिने आत्महत्या केली की तिचा खून केला, अपहरण झाले होते. मग पुन्हा ती विहिरीपर्यंत कशी आली की कोणी आणून टाकले, असे अनेक प्रश्‍न पोलीस प्रशासनापुढे आहेत. मृतदेह सडला असल्याचे तपासी अंमलदार अनिल भरती यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)