मांडके करंडक : गणेश अकादमीवर पीआयओसीचा विजय 

पुणे – उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर गणेश क्रिकेट अकादमीवर 151 धावांनी दणदणीत विजय मिळविताना पीआयओसी “ब’ संघाने मांडके करंडक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. विराग क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पीआयओसी “ब’ संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 212 धावांची मजल मारली. त्यानंतर गणेश अकादमीचा डाव 14 षटकांत सर्वबाद 62 धावांत गुंडाळून पीआयओसी “ब’ संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. गणेश अकादमीकडून केवळ चिन्मय दातेला (10) दुहेरी धावसंख्या नोंदविता आली. पीआयओसी “ब’ संघाकडून सौरव चक्रवतीने केवळ 5 धावांत 2, तर ओम खेंगटने 19 धावांत 3 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पीआयओसी “ब’ संघाकडून सौरव चक्रवर्तीने 55, तर स्वामिराज ढोलेने 51 धावांची खेळी केली. धनंजय देशमुखने 38 धावा करताना त्यांना सुरेख साथ दिली. गणेश अकादमीकडून पृथ्वीराज शिंदे, अर्जुन चव्हाण व साक्षी भालेराव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सौरव चक्रवर्तीला सामन्याचा मानकरी हा पुरस्कार देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)